‘भोगले जे दुःख त्याला’ एक आगळे आत्मचरित्र
आजपर्यंत अनेक उपेक्षितांनी आत्मचरित्र लिहून आपले अंतरंग उघड केले आहे. समाजाकडून, कुटुंबीयांकडून विशेषतः सासरच्या, झालेल्या अनन्वित शारीरिक, मानसिक अत्याचारांच्या अमानुष कहाण्या आपल्या वाचनात आल्या आहेत. मनात वाटलेली कटुता, क्षोभ, प्रचंड भावनिक खळबळ व मरणप्राय उद्विग्नता या सर्व भावभावनांना वाट करून देण्याचे उत्तम साधन म्हणजे आत्मचरित्र. समाजापर्यंत पोचण्याचा समाजमान्य मार्ग. ही प्रत्येक व्यक्तीची मानसिक गरज आहे. …